दूधगंगा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, अकोले ही गेली ३६ वर्षे सहकाराच्या तत्त्वांवर आधारित, विश्वासार्ह व सभासदाभिमुख आर्थिक सेवा देणारी अग्रगण्य सहकारी पतसंस्था आहे. विश्वासाचा अर्थप्रवास करत आज पतसंस्थेने २०,००० पेक्षा अधिक समाधानी ग्राहक आणि ७,५०० हून अधिक सभासदांचा मजबूत विश्वास संपादन केला आहे.
पतसंस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण अकोले तालुक्यात विस्तारले असून अकोले, राजूर, शेंडी, कोतूळ, ब्राम्हणवाडा, धुमाळवाडी रोड (ITI), समशेरपूर, खिरविरे व मेहंदुरी या ठिकाणी शाखांद्वारे सभासदांना सुलभ व विश्वासार्ह सेवा दिली जाते.
बचत वाढीस प्रोत्साहन देणे, सुरक्षित ठेव योजना उपलब्ध करून देणे, सुलभ कर्ज सुविधा देऊन सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. शेतकरी, व्यापारी, नोकरदार, स्वयंरोजगार करणारे व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत.
अनुभवी संचालक मंडळ, पारदर्शक कारभार व आधुनिक बँकिंग सुविधांच्या माध्यमातून दूधगंगा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था अकोले व परिसराच्या सामाजिक-आर्थिक विकासात मोलाचे योगदान देत आहे. सहकारातून समृद्धी या विश्वासावर आधारित आम्ही पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित आणि स्वावलंबी आर्थिक भविष्य घडवण्याचा प्रयत्न करीत आहोत.